माझ्या पत्नीचा पराभव एक लाख टक्के ईव्हीएम मशीनमुळे झाला, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके म्हणाले आहेत. पारनेर विधानसभा मतदारसांघातून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी निवडणूक लढवली होती. मात्र दीड हजारांच्या निसटत्या मतांनी त्यांचा पराभव झाला. यातच माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. लोकसभेतही हा मुद्दा मांडणार असल्याचं लंके म्हणाले आहेत.
निलेश लंके म्हणाले आहेत की, ”ईव्हीएमबद्दल आधी फक्त राजकारणीच संशय घेत होते. आता सामान्य माणसेही संशय व्यक्त करत आहेत. याच मुद्द्यावर 95 वर्षांचे बाबा आढाव यांनी तीन दिवस आत्मक्लेश उपोषण केलं.”
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार निलेश लंके यांनी आभार मेळावा घेतला होता. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, एक महिन्यात गुड न्यूज मिळणार. याचबद्दल त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता निलेश लंके म्हणाले की, राजकरणामध्ये माणसाने कायम आशावादी राहायला हवं. मीही आशावाद व्यक्त केला, यात दुसरं काही नाही.” ते म्हणाले की, ”राजकारणात कुठलीही गोष्ट ठरवून होत नाही. काही गोष्टी अपघातानेही होत असतात.”