बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर भाजपचे सरकार गप्प का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहे, त्यावर केंद्रातले भाजपचे सरकार गप्प का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला. तसेच यावर परराष्ट्र मंत्रालय यावर खरं सांगणार आहे का असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटलंय की, पून्हा एकदा बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत असं आम्ही ऐकतोय, पण यावर केंद्र सरकार शांत आहे. आम्ही जे ऐकतोय ते खरं आहे की नाही? महिन्याभरापूर्वी जेव्हा बीसीसीआय (भाजप प्रणित) बांगलादेशच्या टीमला भारतात खेळायला आमंत्रण दिलं होतं तेव्हाही आम्ही हाच प्रश्न विचारला होता. हे जर खरं असेल तर हाऊसिंग सोसायटीच्या निवडणुकीतही आम्हाला हिंदुत्व शिकवणारे गप्प का आहेत? भाजपचे केंद्र सरकार गप्प का आहे? परराष्ट्र मंत्रालय यावर खरं काय आहे हे सांगणार आहे का? असेही आदित्य ठाकरे म्हणाले.