जगातल्या संतप्त देशांची यादी आली समोर, हिंदुस्थानचे कितवे स्थान पाहूया

जगभरात वेगवेगळ्या देशात राहणाऱ्या नागरिकांबाबत वेगवेगळ्या लिस्ट समोर येत असतात. यात हॅप्पीनेस इंडेक्स लिस्ट, अमीर देशांची लिस्ट, गरीब देशांची लिस्ट अशा लिस्ट जारी केल्या जातात. आता आणखी एक लिस्ट समोर आली आहे. त्यात जगातील संतप्त देशाची यादी समोर आली आहे.

संतप्त देशांची ही यादी गॅलपने तयार केली आहे. 2024 च्या ग्लोबल इमोशन्स अहवालानुसार, लेबनॉन हा जगभरातील देशांमध्ये सगळ्यात संतप्त देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्यांच्या लोकसंख्येत नाराज असलेल्या लोकांपैकी 49 टक्के लोकांनी संतप्त आहेत. हा आकडा देशात चाललेल्या राजकारण, आर्थिक आणि सामाजिक संकटाचे गांभीर्य दाखवतात. सध्या लेबनॉन इस्त्रायलसोबतच्या युद्धात व्यस्त आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड निराश आहेत. दरम्यान इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत जवळपास 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे., ज्यामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे असंतोषाचे वातावरण आहे. जातीय विभाजन आणि संघर्षांमुळे समाज अधिक अस्थिर झाला आहे

लेबनॉननंतर तुर्की दुसऱ्या क्रमांकावर आहे. जे गेल्या वर्षीच्या भूकंपामुळे झालेला विध्वंस आणि आर्थिक संकटामुळे आजतागायत सावरलेले नाहीत. आर्मेनिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. अलीकडच्या काळात नागोर्नो-काराबाख संघर्ष आणि प्रादेशिक अस्थिरता यामुळे त्रस्त आहे. याशिवाय इराक, अफगाणिस्तान, जॉर्डन, माली आणि सिएरा लिओनचाही या देशांचा या यादीत समावेश आहे. मात्र, या यादीत हिंदुस्थानचा क्रमांक कोणता आहे, याची माहिती नाही.

लेबनॉनमध्ये संताप वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हिजबुल्लाहचा प्रभाव मानले जात आहे. त्याच्या लष्करी आणि राजकीय सामर्थ्याने राज्य व्यवस्था कमकुवत केली. इस्रायलसोबतच्या वाढत्या तणावामुळे लेबनीज लोकांमध्ये असुरक्षितता वाढली आहे. यामुळे, देशाला 2024 मध्ये 6.6% आर्थिक घसरणीला सामोरे जावे लागत आहे. एकेकाळी मध्य पूर्वेचे स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाणारे लेबनॉन आता राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचे प्रतीक बनले आहे.