महानायक अमिताभ बच्चन कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. जगभरात त्यांचे अनेक चाहते असून त्यांची एक झलक पाहण्यासाठी मुंबईतील ‘जलसा’ बंगल्याबाहेर रांगा लागलेल्या असतात. विशेष म्हणजे अमिताभही त्यांच्या चाहत्यांना कधी नाराज करत नाहीत. दर रविवारी ते चाहत्यांना भेटण्यासाठी आपल्या बंगल्याबाहेर येतात आणि त्यांना भेटतात. यावेळी काही चाहते त्यांच्यासाठी अनोख्या भेटवस्तूही घेऊन येतात. पण यावेळी त्यांच्या एका चाहत्याने आणलेल्या भेटवस्तूने अमिताभही भारावले आणि त्यांनी केलेल्या कृतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यानंतर अमिताभ बच्चन ‘जलसा’ बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटतात. यावेळी एका चाहत्याने अमिताभ यांच्यासाठी आणलेल्या भेटवस्तूने सर्वांचे लक्ष वेधले. त्या चाहत्याने अमिताभ यांच्यासाठी विठ्ठलाची मूर्ती आणली होती. ती तो हात उंचावून त्यांना दाखवत होता. यावेळी अमिताभ यांनी विठ्ठलाची मूर्ती पाहून हात जोडले आणि आशिर्वाद घेतला. त्यांच्या या कृतीने सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत. या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
यावेळी अमिताभ बच्चन आपल्या सर्व चाहत्यांना हात जोडून तर कधी हात उंचावून प्रतिसाद देताना दिसत आहेत.