साऊथ इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्नाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नसून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शोभिताच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. शिवाय तिची इंस्टाग्रामवरील शेवटची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
बंगळुरु येथे शोभिता शिवन्ना हिचा जन्म झालाय तिने बंगळुरुच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी येथून फॅशन डिझायनिंगची डिग्री घेतली होती. तिने 2015 मध्ये कन्नड सिनेमा रंगी तरंगा पासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर यू टर्न, के.जी.एफ: चॅप्ट 1-2, एराडोंडला मूरु, जॅकपॉट सारख्या सिनेमांमध्ये तिने काम केले होते. शिवाय अभिनेत्रीने गलीपाटा, मंगला गौरी, कोगिले, कृष्णा रुक्मिणी आणि अम्मावरु सारख्या मालिकांमध्येही काम केले होते.
शोभिताने इंस्टाग्रामवर टाकलेली अखेरची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. 16 नोव्हेंबर रोजी शोभिता एक व्हिडीओ शेअर केला होता, त्यात ती निर्वाण स्टुडिओत दिसली होती. व्हिडीओमध्ये एक गायक ‘इंतेहा हो दई इंतजार की’ गाणे गाताना दिसत आहे. तो गायक गिटार वाजवून ते गाणे गात होता. ही पोस्ट दोन आठवड्यांपूर्वीची आहे. तिचे इंस्टाग्रामवर 19.8k फॉलोअर्स असून तिने 232 पोस्ट केले होते,.