बांग्लादेशी हिंदूंच्या सन्मानासाठी शिवसेना मैदानात, छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात आज धरणे आंदोलन

बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून छत्रपती संभाजीनगर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी याबाबत माहिती दिली आहे. आज दि. 2 डिसेंबर रोजी हे आंदोलन करण्यात येणारआहे.