प्लॅटफॉर्म तिकीट विक्री आठवडाभर बंद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला होणारी गर्दी लक्षात घेऊन काही निवडक स्थानकांवर 2 ते 9 डिसेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे तर राज्यातील काही मुख्य स्थानके यातून वगळण्यात आली आहेत. प्लॅटफॉर्मवर होणाऱया गर्दीवर नियंत्रण ठेवून प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, मात्र ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय उपचार सुरू असलेल्या रुग्णांना हे तिकीट खरेदी करता येणार आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही निवडक स्थानकांवर 2 ते 9 डिसेंबर या आठवडाभराच्या कालावधीसाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई विभागामधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, भुसावळ विभागामधील बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक-नागपूर विभागामधील नागपूर आणि वर्धा, पुणे विभागामधील पुणे तर सोलापूर विभागामधील सोलापूर स्टेशन या स्थानकांना यातून वगळण्यात आले आहे.