डिलिव्हरी बॉयचे साहित्य चोरणाऱ्याला मलबार हिल पोलिसांनी अटक केली. लखन वाघमारे असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात विविध ई-कॉमर्स कंपन्यांकडून ऑनलाइन वस्तू मागवणाऱयांची संख्या अधिक आहे. वस्तू डिलिव्हरीसाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयचे साहित्य चोरी होत असल्याच्या घटना घडल्या. वस्तू चोरीप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याची गंभीर दखल मलबार हिल पोलिसांनी घेतली. तपासासाठी पथक तयार केले. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी लखनला वरळी येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने गुह्याची कबुली दिली. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.