पंतप्रधान मोदी यांनी डिजिटल अ‍ॅरेस्टबद्दल व्यक्त केली चिंता

डिजिटल अ‍ॅरेस्टसारख्या वाढत्या गुह्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा तीव्र चिंता व्यक्त केली. डिजिटल फ्रॉड, सायबर गुन्हे घडत आहेत. एआय टेक्नॉलॉजिचा वापर करून फसवणुक होत आहे. ही अत्यंत काळजी करण्यासाठी गोष्ट असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षकांच्या 59 व्या अखिल भारतीय परिषदेत ते बोलत होते. एआय टेक्नॉलॉजिसह अद्ययावत तंत्रत्रानाचा वापर पोलिसांचा कामावरचा ताण कमी व्हावा म्हणून करण्यात यावा असेही ते म्हणाले. दरम्यान, डिजिटल ऍरेस्टच्या माध्यमातून कोची येथील एका व्यक्तीची 4 कोटी 12 लाख रुपयांची फसवणूक करणाऱया दोघांना पोलिसांनी आज अटक केली.