क्वीन इज बॅक

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा हल्ली वरचे वर रंगतात. याबाबत बच्चन कुटुंबीयांकडून अद्याप एकदाही भाष्य करण्यात आलेले नाही.  अशातच ऐश्वर्याच्या मेकअप आर्टिस्टने तिच्यासोबतचा फोटो शेअर केलाय. फोटो पाहून असं वाटतंय की ऐश्वर्याने पुन्हा काम सुरू केलंय. अर्थात फोटोवरून हे कोणत्याही चित्रपटाचे काम नसून जाहिरातीचे काम असल्याचे दिसून येतंय. ऐश्वर्याने काम सुरू केल्यामुळे तिचे चाहते खूश झाले आहेत. ‘अवर क्वीन इज बॅक टू वर्क’ असे तिचे चाहते म्हणत
आहेत.