एलन मस्कने ‘ओपनएआय’ला  कोर्टात खेचले

अमेरिकेतील आर्टिफिशल इंटेलिजन्स कंपनी ‘ओपनआय’ला एलन मस्कने कोर्टात खेचले. ‘ओपनएआय’ कंपनी प्रतिस्पर्धांना संपवण्याचा प्रयत्न करतेय. ओपनएआयचा व्यवहार प्रतिस्पर्धी विरोधी आहे, असा आरोप करत एलन मस्कने कॅलिफोर्नियाच्या जिल्हा न्यायालयात धाव घेतली.

मस्क यांनी याचिकेत ‘ओपनएआय’ कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन, अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन, माजी बोर्ड सदस्य रिड हॉफमॅन आणि डी. टेंपलटन यांच्यावर अवैध व्यवहार केल्याचा आरोप केलाय. एआय संशोधन सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून देणे या बिगर नफ्याच्या ध्येयापासून ‘ओपनएआय’ दूर गेल्याचा आरोप मस्क यांनी केला आहे. तसेच कंपनीचा बदलता व्यवहार थांबवण्याची मागणी केलेय. गुंतवणूकदारांना प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापासून रोखणे, मायक्रोसॉफ्टला माहिती शेअर करणे असे अन्य काही आरोप याचिकेत करण्यात आले आहेत.

मस्क यांचे आरोप फेटाळले

ओपनएआयने मात्र मस्क यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. मस्क यांनी चौथ्यांदा लावलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचे ओपनएआयने म्हटलंय.