मध्य प्रदेशातील खरगोन जिह्यात बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एका मुलासह चार जणांचा मृत्यू झाला, तर 21 प्रवासी जखमी झाले आहेत. दोन जेसीबीच्या साहाय्याने दरीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली. दुपारी 12 वाजताच्या सुमारास संबंधित बस 25 ते 30 प्रवाशांना घेऊन अलीराजपूरसाठी निघाली असता अपघात झाला. या भीषण अपघातात एका बालकासह तीन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. 11 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.