सरकार स्थापनेवरून राज्यात सध्या महायुतीचा गोंधळ पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठ दिवस झाले तरी अद्याप महायुतीने आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. आता याच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीवर टीका केली आहे.
‘एक्स’वर एक पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, ”निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला सरकार बनवण्याची वेळ आली असती, तर विधानसभेची मुदत संपताच 26 नोव्हेंबर नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असती. तसेच पडद्यामागून महाशक्तीने सरकार चालवले असते.”
ते पुढे म्हणाले, ”मात्र आज निकाल लागून 8 दिवस उलटले तरी नेता निवडला जात नाही आणि सरकारही बनवलं जात नाही. पण यांच्या खेळात राज्याचा मात्र खोळंबा होतोय, याचं महायुतीला काहीही देणंघेणं नाही, हे दुर्दैवी आहे.”
निवडणुकीनंतर #मविआ ला सरकार बनवण्याची वेळ आली असती तर विधानसभेची मुदत संपताच २६ नोव्हेंबर नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावून पडद्यामागून #महाशक्तीने सरकार चालवले असते…. पण आज निकाल लागून ८ दिवस उलटले तरी नेता निवडला जात नाही आणि सरकारही बनवलं जात नाही.. पण यांच्या खेळात…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 30, 2024