विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत महाघोटाळा झाल्यानेच भाजप आणि मिंधे सरकार सत्तेत आले आहे, अशी जनभावना आहे. महायुतीला मिळालेल्या वाढीव मतांबद्दल लोकांच्या मनातच शंका उपस्थित होत असून ती दूर करणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. निवडणूक आयोगाने स्वतः पुढे येऊन भूमिका पुराव्यासह स्पष्ट करावी. त्यासाठी मतदानाच्या दिवशी रात्री साडेअकरापर्यंत राज्यात कुठे कुठे मतदान सुरू होते त्याचे सीसीटीव्ही फुटेज द्या, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून केली आहे.
नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाची आकडेवारी मांडत काही प्रश्न उपस्थित पेले आहेत. आयोगाच्या आकडेवारीनुसार, 20 नोव्हेंबरला रात्री 11.30 वाजेपर्यंत 65.2 टक्के मतदान झाले होते. दुसऱया दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी 66.05 टक्के होती. निवडणूक आयोगाने स्वतः अधिकृतरीत्या जाहीर केलेल्या आकडेवारीत 1.03 टक्क्यांची तफावत कुठून आली? एका दिवसात तब्बल 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली? मतांमधील 7.83 टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. मतांच्या टक्केवारीतील तफावत पाहता हा प्रकार गंभीर आहे, नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.
पटोले यांनी उपस्थित केलेले प्रश्न
n एका मतासाठी साधारणपणे एक मिनीट लागते, असे गृहित धरले तरी वाढलेली मते आणि त्यासाठी लागणारा वेळ विचारात घेता काहीच ताळमेळ लागत नाही.
n राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी 5 नंतर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? निवडणूक आयोगाने मतदान पेंद्रांवर सीसीटीव्ही लावले होते, त्याचे चित्रीकरण दाखवावे!
n मतदान झाल्यावर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असते, यावेळी आयोगाने पत्रकार परिषद का घेतली नाही?