ड्रग पार्सलच्या नावाखाली 91 लाख रुपये उकळले 

कुरिअर ड्रगच्या नावाखाली ठगाने वृद्धाच्या बँक खात्यावर डल्ला मारला. कारवाईची भीती दाखवून 91 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.  तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱयाने तो दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून बोलत असल्याचे भासवले. दिल्ली कस्टमकडून एक पार्सल आले आहे. मलेशियाला जात असलेल्या पार्सलमध्ये ड्रग असल्याचे भासवले. त्यानंतर तो पह्न दिल्ली पोलिसांना दिला. त्याने तक्रारदार यांच्याकडे माहिती विचारली. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल केला. ठगाने तक्रारदार व्हिडीओ कॉल करताना पॅमेरा सुरू ठेवण्यास सांगितले. मानवी तस्करी आणि मनी लॉण्डरिंगचा गुन्हा नोंद आहे अशी भीती दाखवली.