चिकुनगुनियाची रुग्णसंख्या तिपटीने वाढली

सातत्याने बदलणाऱया वातावरणात डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात झाल्याने यंदा चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत पाच हजार 445 चिकुनगुनिया बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चिकुनगुनियाची रुग्णसंख्या तीन ते साडेतीनपटीने वाढली आहे. तर मागील पाच वर्षांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद यावर्षी झाली आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक रुग्णसंख्या आढळून येत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे.