’द्रष्टा कर्मयोगी-नाना शंकरशेट’ पुस्तकाला उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार, आज वितरण समारंभ

ज्येष्ठ साहित्यिक, रवींद्र माहीमकर लिखित ‘द्रष्टा कर्मयोगी नाना शंकरशेट’ या पुस्तकाला वंदना प्रकाशन मुंबई या संस्थेचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचा ‘आशीर्वाद पुरस्कार’ जाहीर झाला. उद्या शनिवारी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात होणाऱया सोहळय़ात प्रसिद्ध अर्थतज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते रवींद्र माहीमकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मुंबईचे आद्यशिल्पकार, थोर समाजसुधारक आणि हिंदुस्थानी रेल्वेचे आद्यशिल्पकार नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांच्या कार्यकर्तृत्वावर हे पुस्तक आधारीत असून ‘आपलं प्रकाशन’ या संस्थेच्या माध्यमातून या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमात अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे, वंदना प्रकाशनचे डॉ. सुनील सावंत, राजीर श्रीखंडे, प्रा. रमेश कोटस्थाने उपस्थित राहतील.