अर्जुन सिंगला दुहेरी जेतेपद; मुंबई मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत प्रीतिक्षा, अगस्त्य, लक्ष्य, कथित, आशवी, सागरही विजेते

मुंबईतील शालेय बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विस्डम बुद्धिबळ अकादमीने आयोजित केलेल्या मुंबई मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत अर्जुन सिंगने 11 आणि 12 वर्षांखालील अशा दोन्ही गटात बाजी मारली तर प्रीतिक्षा नंदी, अगस्त्य पटवा, लक्ष्य पिल्लई, कथित शेलार, आशवी अगरवाल आणि सागर शेणॉय यांनी विविध गटांत अव्वल स्थान पटकावत जेतेपद पटकावले.

मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेसाठी राज्यभरातून 6 ते 15 वर्षे वयोगटातील 400 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या शालेय बुद्धिबळपटूंनी अंधेरी पश्चिमेला वालिया कॉलेजमध्ये आयोजित मुंबई मास्टर्स स्पर्धेत जलद बुद्धिबळाचा मनसोक्त आनंद घेतला. आयोजक अक्षय सावंत यांनी पुढाकार घेत नीटनेटके आयोजन केलेल्या स्पर्धेचे खेळाडूंच्या पालकांनी विशेष काwतुक केले. या स्पर्धेत प्रीतिक्षा नंदी, लक्ष्य पिल्लई, कथित शेलार आणि अर्जुन सिंग यांनी नॉनस्टॉप विजयासह सर्व डाव जिंकत बाजी मारली.

मुंबई मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल

6 वर्षांखालील गट – 1. प्रीतिक्षा नंदी (6), 2. राजवीर घुमान (5), 3. प्रिशा मुंद्रा (5), 4. रोहित प्रभाव (5), 5. रियांश पितळे (5);

7 वर्षांखालील गट – 1. अगस्त्य पटवा (6), 2. समायरा थोरात (5), 3. स्वयम लिगाडे (5), 4. जिनेन मेहता (5), 5. मिराज सरदान्हा (5);

8 वर्षांखालील गट – 1. लक्ष्य पिल्लई (6), 2. नित्या बंग (5), 3. रेयांश पेरीवाल (5), 4. पक्षाल गाडा (5), 5. एडन लसराडो (4.5);

9 वर्षाखालील गट – 1. कथित शेलार (6), 2. गिरिषा पै (5), 3. एडन लसराडो (5), 4. रेयांश पेरीवाल (5), 5. दैविक जैन (4.5);

10 वर्षांखालील गट – 1. आशवी अगरवाल (5.5 गुण), 2. इशान अगरवाल (5.5), 3. जियाना गाला (5), 4. मान्या द्रोलिया (4.5), 5. लक्ष्य परमार (4.5);

11 वर्षांखालील गट – 1. अर्जुन सिंग (6), 2. मान्य द्रोलिया (5), 3. अनीश म्हात्रे (5), 4. लक्ष्मी वरेण्य (5), 5. दिवीत मोदी (4.5);

12 वर्षांखालील गट ः 1. अर्जुन सिंग (5), 2. प्रणव भगतानी (4), 3. शिव मेहता (4), 4. गिरिषा पै (4), 5. क्रिश बिजलानी (3.5);

15 वर्षाखालील गट ः 1. सागर शेणॉय (5.5), 2. विवान सरदान्हा (5), 3. प्रिशा मर्गज (4.5), 4. शर्विन बडवे (4.5), 5. वागिश स्वामिनाथन (4.5).