हॅरी ब्रुकच्या नाबाद शतकामुळे इंग्लंड मजबूत

अवघ्या 71 धावांत आघाडीचे चार फलंदाज बाद झाल्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव अडचणीत आला होता, पण त्यानंतर हॅरी ब्रुकने घणाघाती शतकी खेळी करताना ओली पोपसह 151 धावांची भागी रचत संघाला सावरले. पोप 77 धावांवर बाद झाला. त्यानंतर ब्रुकने कर्णधार बेन स्टोक्सच्या (37) साथीने सहाव्या विकेटसाठी 97 धावांची भागी रचत इंग्लंडच्या डावाला बळकटी दिली. न्यूझीलंडने पहिल्या डावात 348 धावा केल्या होत्या. अवघी 22 वी कसोटी खेळत असलेल्या ब्रुकने आपल्या दोन हजार धावांचा टप्पा गाठताना सातवे शतकही साजरे केले. त्याने आपल्या खेळीत दोन षटकार दहा चौकार लगावले.