मध्य प्रदेशात 3 नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी 70 कोटी खर्च

मध्य प्रदेश सरकारने अवघ्या 3 नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी तब्बल 70 कोटी रुपये खर्च केले असून या नक्षलवाद्यांसाठी एक पोलीस महासंचालक, एक पोलीस उपमहासंचालक आणि सहा पोलीस अधीक्षक पदांच्या अधिकाऱ्यांसह 7500हून जास्त सुरक्षा दलाचे जवान, स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि केंद्रीय सुरक्षा दल (सीआरपीएफ) जवानांना तैनात केले आहे, अशी अचंबित करणारी माहिती समोर आली आहे. या जवानांना नक्षल भागात तैनात करण्यात आले. मध्य प्रदेशात जे तीन नक्षलवादी आहेत त्यांना सरकार 24 वर्षांपासून अटक करू शकली नाही. 2000 साली यातील एका नक्षलवाद्याला पकडण्यात आले होते. परंतु 2004मध्ये त्याची सुटका झाली. या नक्षलवाद्यांचा ग्रामीण भागात चांगले नेटवर्क असल्याने प्रत्येक वेळी ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होतात. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, दीपक ऊर्फ सुधाकर असे पहिल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. दुसऱयाचे नाव संगीता आहे, तर तिसऱयाचे नाव राम सिंह उर्फ संपत आहे.