कोरियन ड्रामा सध्या जगभरात खूप लोकप्रिय होताना दिसत आहे. कोरियन ड्रामामधील रोमान्स, ॲक्शन किंवा थ्रिलर लोकांना पाहायला आवडतं. कोरियन ड्रामाचे चाहते सर्वत्र वाढत आहेत, परंतु उत्तर कोरियामध्ये हे चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणे गुन्हा आहे आणि यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? उत्तर कोरियामध्ये कोरियन ड्रामावर बंदी आहे. येथे कोरियन ड्रामा पहिल्यावर काय मिळते शिक्षा, याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…
येथील नागरिकांनी दक्षिण कोरियाची जीवनशैली पाहून त्यातून प्रेरित होऊ नये, असे उत्तर कोरियाच्या सरकारला वाटत. दक्षिण कोरियामध्ये दाखवल्या जाणाऱ्या ड्रामामध्ये सामाजिक राहणीमान उत्तर कोरियाशी मिळतंजुळतं नाही. म्हणून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर कोरियाच्या सरकारला भीती आहे की, हे ड्रामा पाश्चात्य विचारांच्या लोकांवर प्रभाव टाकू शकतात, जे त्यांच्या कठोर नियमांच्या विरोधात जाऊ शकतात. त्यामुळेच त्यांनी दक्षिण कोरियन चित्रपट आणि वेब सिरीजवर बंदी घातली आहे.
कोरियन ड्रामा पाहिल्यास काय होते शिक्षा?
उत्तर कोरियामध्ये दक्षिण कोरियाचे चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणाऱ्या लोकांसाठी कठोर नियम आहेत. तिथे कोणी अशी चित्रपट बघताना आढळल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. याशिवाय दक्षिण कोरियातील ड्रामा पाहिल्यास मृत्यूदंडही दिला जाऊ शकतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जर उत्तर कोरियामध्ये एखादी व्यक्ती दक्षिण कोरियाचे चित्रपट आणि वेब सिरीज पाहताना आढळली तर फक्त त्यालाच नाही, तर त्याच्या कुटुंबालाही शिक्षा केली जाते.