पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी फोनवरून देणाऱया महिलेला अंबोली पोलिसांनी अटक केली. आरोपी महिला मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे समजते.
बुधवारी रात्री मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक पह्न आला. पह्न करणाऱया महिलेने आपल्याकडे शस्त्र असून पंतप्रधान मोदी यांना मारण्याची तयारी सुरू केल्याचे सांगून तिने पह्न ठेवला. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
धमकीच्या फोननंतर पोलिसांनी सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. फोन करणाऱ्या महिलेला पोलिसांनी फोन केला. मात्र तिने फोन उचलला नाही. धमकीचा फोन करणाऱया महिलेचा शोध घेण्यात आला. काही तासांतच पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. ती महिला 34 वर्षांची असून ती मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्या महिलेविरोधात गुन्हा नोंद करून तिला अटक केल्याचे वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. फोन करण्यामागे घातपाती हेतू नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.