अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याची 3 कारणे सादर, नसरुद्दीन चिश्ती यांनी म्हटले हे अत्यंत वेदनादायी

ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या जागी शिवमंदिर असल्याचा दावा करण्यता आला असून  याचिका दाखल करणारे हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी याबाबत 3 कारणे सांगितली आहेत. तर अजमेर दर्ग्याचे मुख्य उत्तराधिकारी आणि ख्वाजा यांचे वंशज नसरुद्दीन चिश्ती यांनी याप्रकरणी प्रचंड नाराजी व्यक्त करत अशा कृती देशाच्या एकात्मतेला धोका आहेत. हे अत्यंत वेदनादायी असून चिंताग्रस्त करणारे आहे. नेमकी समस्या काय आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

याप्रकरणी विष्णू गुप्ता यांनी म्हटले आहे, 2 वर्षांचे संशोधन आणि निवृत्त न्यायाधीश हरबिलास शारदा यांच्या पुस्तकात दिलेल्या तथ्यांच्या आधारे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या पुस्तकात एक ब्राम्हण जोडपे येथे राहत होते आणि दर्ग्याच्या ठिकाणी बांधलेल्या महादेव मंदिरात पूजा करत होते असा उल्लेख आहे. तसेच इतरही अनेक तथ्ये आहेत. दरम्यान, न्यायालयाने अल्पसंख्याक मंत्रालय, दर्गा समिती आणि  पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांना 20 डिसेंबर रोजी होणाऱया सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.