‘माता यशोदा’मध्ये आरोग्याचा कानमंत्र

सध्याच्या धावपळीच्या व प्रगत युगात अनेकजण आपल्या आहाराकडे व झोपेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. आजार होऊ नयेत म्हणून काय खबरदारी घ्यावी, चांगल्या आरोग्यासाठी कोणत्या सवयी लावून घ्या, याविषयी माहिती देणारा ‘माता यशोदा’ आरोग्य अंक मागील 30 वर्षे प्रकाशित होत आहे. नुकताच 31 वा ‘माता यशोदा’ आरोग्य अंक प्रकाशित झाला.

या अंकात विविध आजारांवर मान्यवर डॉक्टरांचे मार्गदर्शनपर लेख वाचता येतील. 31 व्या ‘माता यशोदा’च्या अंकात प्रख्यात कार्डियाक सर्जन डॉ. दीपक पालांडे, डॉ. वर्णन वेल्हो, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अजय चंदनवाले, पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. तरळ नागदा, स्त्राrरोग सर्जन डॉ. सचिन नाईकनवरे,  पीडियाट्रिक जनरल सर्जन डॉ. राजीव रेडकर, जनरल सर्जन डॉ. कविता जाधव, डॉ. अमोल वाघ, छातीविकार फिजिशियन डॉ. रोहित हेगडे, कॅन्सर मेडिसिन फिजिशियन्स डॉ. दिलीप निकम, मेडिसिन फिजिशियन्स डॉ. मधुकर गायकवाड, रेडिओलोजिस्ट डॉ. अरविंद जैन, पीडियाट्रिक  डेंटल सर्जन डॉ. डिंपल पाडावे, नेत्र सर्जन  डॉ. अमित जैन आदींचे विविध आजाराबाबतची व प्रतिबंधात्मक उपाय याबाबतची माहिती लेख स्वरूपात आहे. स्वच्छता, प्रदूषण, पर्यावरण, शिस्त यांचे महत्त्व पटवून देणारे संदेश प्रत्येक पानावर छापले आहेत.