आयआयटी कानपूरने एक अद्भुत तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे सैन्य, विमाने आणि रणगाडय़ांना शत्रूंच्या रडारपासून आणि यंत्रणेपासून वाचवता येईल. जवानांना आणि लढाऊ विमानांना ‘मिस्टर इंडिया’सारखे अदृश्य करता येईल. या तंत्रज्ञानाला ‘मेटामटेरियल सरफेस क्लॉकिंग सिस्टीम’ असे म्हणतात.
आयआयटी कानपूरच्या तीन शास्त्रज्ञांनी मेटामटेरियल तंत्रज्ञान विकसित केलंय. प्रा. कुमार वैभव श्रीवास्तव, प्रा. एस. अनंत रामकृष्णन आणि प्रा. जे. रामकुमार अशी त्यांची नावे आहेत. तिघांनी 2010 पासून काम सुरू केले. त्यांनी 2018 मध्ये पेटंटसाठी अर्ज केला. हिंदुस्थानी लष्करासोबत मागील सहा वर्षे या तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे.
काय आहे मेटामटेरिअल
– मेटामटेरिअल हा असा एक कपडा आहे, जो जवानांना आणि त्यांच्या उपकरणांना शत्रूच्या रडार, सॅटेलाईट, इफ्रारेड कॅमेरा आणि थर्मल इमेजरपासून वाचवू शकतो.
– मेटामटेरिअल सैनिकांचा युनिफॉर्म, लष्करी गाडय़ांचे कव्हर, विमानांचे कव्हर यामध्ये वापरता येईल.
– जर या तंत्रज्ञानाला लवकर मंजुरी मिळाली तर मेटामटेरिअल वर्षभराच्या आत लष्कराला मिळेल, असे मेटातत्व कंपनीने म्हटले.