अभिनेत्री नयनतारा गेल्या काही दिवसांपासून बऱ्याचदा चर्चेत आली आहे. नेटफ्लिक्सवर नयनताराची लग्नाची एक डॉक्यूमेंटरी रिलीज झाली आहे. या डॉक्यूमेंटरीमुळे ती वाजाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नयनताराच्या या डॉक्यूमेंटरी व्हिडीओनंतर अभिनेता धनुषने नयनतारावर तीन सेकंदांच्या क्लिपसाठी तब्बल 10 कोटींचा दावा ठोकला आहे. तसेच तिच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केलाय. मात्र धनुशच्या या तक्रारीनंतर नयनतारानेही एक पत्र लिहून धनुषवर गंभीर स्वरुपाची टीका केली. त्यामुळे हे प्रकरण नेमक काय आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
नेटफ्लिक्सवर नयनताराची लग्नाची एक डॉक्यूमेंटरी रिलीज झाली. ‘नयनतारा: बियॉन्ड द फेअरी टेल’ असे या डॉक्युमेंटरीचे नाव आहे. या डॉक्यूमेंटरी मेकर्सने धनुष तसेच त्याच्या टीमची परवानगी न घेताच नानुम राउडी धान या चित्रपटातील एका सीनचा वापर केला आहे. त्यामुळे धनुषने नयनतारा, नयनताराचा नवरा, फिल्ममेकर विग्नेश सिवन यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
धनुषने केलेल्या तक्रारीवर नयनताराने निर्णयाबाबत तिने नाराजी मात्र व्यक्त केलेली आहे. या प्रकरणानंतर नयनताराने 16 नोव्हेंबर रोजी तिच्या इन्स्टाग्रामवर धनुषसाठी एक लेटर पोस्ट केले होते. धनुष सर्वांत खालच्या स्तरावर पोहोचला आहे, असं नयनताराने या पत्रात म्हटलंय.
नयनताराने धनुषला लिहिलेल्या ओपन लेटरमुळे चर्चांना उधाण आले आहे. या पत्रानंतर धनुषच्या टीमने नयनताराला नोटीस पाठवली होती. तसेच 24 तासांच्या आत तुम्ही ती 3 सेकंदांची ती क्लिप हटवावी, अशी मागणी केली होती. मात्र नयनताराने यासगळ्यासाठी विरोध केला आहे.