सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नावर आई नाराज? पूनम सिन्हा यांच्या वक्तव्याने खळबळ

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने काही महिन्यांपूर्वीच तिचा प्रियकर जहीर इकबालसोबत सुखी संसारासाठी लग्नगाठ बांधली. सध्या ती तिच्या नवऱ्यासोबत तिच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. लग्न झाल्यापासून सोनाक्षी आणि जहीर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. अलीकडेच, संपूर्ण सिन्हा कुटुंब पहिल्यांदाच जावई जहीरसोबत द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये गेले होते. जिथे पूनम सिन्हा आणि शत्रुगन सिन्हा त्यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल आणि जावयाबद्दल बोलताना दिसले.

द ग्रेट इंडियन कपिल शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी सोनाक्षी, तिचा नवरा जहीर आणि आई वडील पूनम आणि शत्रुघन सिन्हा हे सगळेच उपस्थित होते. यावेळी कपिल शर्माने लग्नाबाबत अनेक प्रश्न विचारले. यावर पूनम सिन्हा यांनी जे उत्तर दिले ते ऐकून सगळेच थक्क झाले आहेत.

What did it mean lol
byu/Used_Confection6060 inBollyBlindsNGossip

कपिलने पूनम सिन्हा यांना लग्नाच्या वेळी तुम्ही मुलगी सोनाक्षीला काय सल्ला दिला होतास? असा प्रश्न विचारला होता. यावर,’माझी आई नेहमी म्हणायची की तू नेहमी तुझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसाशी लग्न कर. मी ते ऐकलं आणि तसं केलं. पण माझ्या मुलीने काय केले? तिने ज्याच्यावर प्रेम केले त्याच्याशी लग्न केले. आईने जे सांगितले ते ऐकून सोनाक्षी थक्क झाली. मात्र सोनाक्षीने हा क्षण खूप छान हाताळले. जहीरला वाटते की तो माझ्यावर जास्त प्रेम करतो. मला वाटते की मी त्याच्यावर अधिक प्रेम करतो. आता हे प्रकरण कोण सोडवणार? असे सोनाक्षी यावर म्हणाली.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. पूनम यांच्या वक्तव्यावर युजर्सनी प्रतिक्रिया देत असताना सोनाक्षीला पाठिंबा दिला. सोनाक्षी आणि जहीरने 7 वर्षे डेटिंग केल्यानंतर यावर्षी 23 जून रोजी मुंबईत लग्न केले. जहीर आणि सोनाक्षीने एकत्र काम केले आहे. दोघे ‘डबल एक्सएल’मध्ये एकत्र दिसले होते.