प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी प्रियंका गांधी यांनी तेच केले जे राहुल गांधी यांनी सहा महिन्यांपूर्वी केले होते. प्रियंका गांधी यांनी संविधान हाती घेऊन खासदारकीची शपथ घेतल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट करत इतर सदस्यांनी त्यांचं अभिनंदन केलं.
ईडी, सीबीय, इन्कम टॅक्स यासह इतर तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना आणि त्यांच्या आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. सत्ताधारी भाजपकडून ठिकठिकाणी लोकशाही आणि संविधानाची पायमल्ली होत आहे. या विरोधात विरोधी पक्ष एकजूट आणि आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी त्यांना संविधान दाखवले जात आहे. लोकशाहीच्या मंदिरात म्हणजेच संसदेत सत्ताधाऱ्यांना संविधान हे दाखवून विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून फटकारले जात आहे. तेच आज प्रियंका गांधी यांनी खासदारकीची शपथ घेताना आपल्या कृतीतून केले.
मैं प्रियंका गांधी वाड्रा…
जो लोक सभा की सदस्य निर्वाचित हुई हूं, सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करती हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी।
मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगी तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाली हूं, उसके… pic.twitter.com/3iN7PHwuIq
— Congress (@INCIndia) November 28, 2024
लोकसभा निवडणुकीचे निकाल जूनमध्ये लागले. त्यानंतर निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदारांनी लोकसभेत शपथ घेतली. त्यावेळी 25 जूनला राहुल गांधी यांनी लोकसभेत खासदारकीची शपथ घेताना संविधान हाती घेतले होते. संविधान हाती घेत राहुल गांधी यांनी खासदारकीची शपथ पूर्ण केली. त्यानंतरही सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात राहुल गांधी यांचं अभिनंदन करण्यात आलं. आता प्रियंका गांधी यांनीही तेच केलं जे राहुल गांधी यांनी केलं होतं. प्रियंका गांधी यांनीही संविधान हाती घेत आज खासदारकीची शपथ घेतली.