हिवाळ्यात डिंकाचे लाडू आवर्जुन खाल्ले जातात. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आणि हाडांना बळकटी येण्यासाठी हे लाडू खाल्ले जातात. तसेच या दिवसात शरीरास ऊर्जेची आवश्यकता असते. डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीराचे तापमान उबदार राहण्यासही मदत होते. डिंकामध्ये अनेक पोषक तत्व असल्याने त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. नेमके कोणकोणते फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया.
– डिंकाच्या लाडूमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. ते खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यासही मदत होते. शिवाय यात फायबर्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे गॅसचा त्रास कमी होण्यासाठीही हा लाडू फायदेशीर ठरतो.
– शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य निरोगी राखण्यासाठी डिंकाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
– डिंक लाडू खाल्ल्याने शरीराचे तापमान उबदार राहण्यास मदत होते.
– थकवा जाणवत असल्यास डिंकाचे लाडू खावेत थकवा नाहीसा होतो.
– डिंक लाडू शरीरातील विषारी पदार्थ काढून चयापचय वाढवण्यास मदत करतात.
– डिंकाचे लाडू आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही उपयुक्त आहे. ते खाल्ल्याने सुरकुत्या आणि फाइन लाइन कमी होण्यास मदत होते.
– हृदयाशी संबंधित समस्यांवरही डिंकाचा लाडू गुणकारी ठरतो. यात गुड फॅट्स असतात. याशिवाय प्रोटीन्स, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते त्यामुळे हृदयाच्या विकारांचा धोका कमी होतो.
– डिंक लाडू खाल्ल्याने गर्भवती महिलांना ताकदीची गरज असते.
– थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण करण्याचं काम डिंक करते. शिवाय गर्भवती महिलांना ताकदीची गरज असते त्यामुळे गर्भवती महिलांनाही हे लाडू खायला दिले जातात.
– डिंक उष्ण असल्यामुळे विशेषत: थंडीमध्ये याचं सेवन करणे फायदेशीर ठरते.