दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिम तीव्र केली आहे. ठिकठिकाणी पोलिसांची छापेमारी सुरू आहे. जम्मू विभागातील चार जिल्ह्यांमध्ये गुरुवारी केलेल्या कारवाईत विविध दहशतवादी गटांच्या 10 ओव्हरग्राउंड कामगारांना (OGW) अटक करण्यात आली आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरुवारी दिली.
कठुआ जिल्ह्यातील मल्हार, बानी, बिल्लावार भागात, काना चक, हरिया चक, सोरक पेन, चक वजीर येथे पोलीस आणि सीआरपीएफने 17 ठिकाणी दहशतवादी तळांवर कारवाई केली.
मल्हार, बिल्लावर आणि बानी या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या दहशतवादी घटनांशी संबंधित तीन एफआयआरच्या संदर्भात हे सुनियोजित ऑपरेशन अंमलात आणले. यात 10 ओव्हरग्राऊंड कामगार आणि दहशतवादी संशयितांची ओळख पटली आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. शोध मोहिमेअंर्तगत अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.