सांगली-कोल्हापूर मार्गावर कृष्णा नदीपुलावरून कार नदीपात्रात कोसळून पती-पत्नीसह तिघांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर कार बुधवारी मध्यरात्री कोल्हापूरहून सांगलीच्या दिशेने जात असताना अंकली येथे कारला अपघात झाला. जखमींना उपचारासाठी सांगली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदकार्य सुरू केले. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी गाडीतून मृतदेह बाहेर काढले. तसेच जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. अपघात नेमका कसा घडला याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत.
प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय 35), प्रेरणा प्रसाद खेडेकर (वय 36) आणि वैष्णवी संतोष नार्वेकर (वय 21) अशी मयतांची नावे आहेत. तर समरजीत प्रसाद खेडेकर (वय 7), वरद संतोष नार्वेकर (वय 19) आणि साक्षी संतोष नार्वेकर (वय 42) अशी जखमींची नावे आहेत.