दिल्लीतील बिजवासन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत सायबर क्राईमशी जोडलेल्या घटनेचा तपासादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ईडीचे सहायक संचालक जखमी झाले आहेत.
या हल्ल्याची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. दिल्लील पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा तपास सुरु केला आहे. या हल्ल्यात ईडीचे एक अधिकारी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनिसार, आज गुरुवारी सकाळी ईडीचे पथक PPPYL Cyber App Fraud case च्या तपासासाठी दिल्लीच्या बिजवासन परिसरात पोहोचली होती. इथे ईडीच्या पथकावर आरोपी अशोक शर्मा आणि त्याच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात ईडीचे सहायक संचालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहेत. तर हल्ल्यातील एक आरोपी फरार झाला आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले. तर स्थानिक पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोहोचली आहे. शिवाय सुरक्षेबाबतही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये लिहीले आहे की, ज्यावेळी अधिकारी छापेमारी करत होते, त्यावेळी हा हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, हल्ल्या दरम्यान खुर्चीही फेकून मारण्यात आली आहे. पोलिसांना घटनास्थळी तुटलेली खुर्ची आढळली. पोलीस सध्या हल्ला कोणी केली याचा शोध घेत आहेत.