झारखंडच्या नव्या सरकारचा आज शपथविधी

झारखंडच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता रांची येथील मोरहाबादी मैदानावर होणार आहे. काँग्रेस नेत्यांसोबतच्या बैठकीत हेमंत सोरेन यांनी काँग्रेस कोटय़ातील मंत्री आणि खात्यांबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राजद कोटय़ातून मंत्रीपदावर चर्चा करण्यात आली. नव्या सरकारमध्ये जेएमएमचे 6, काँग्रेसचे 4 आणि आरजेडीचा 1 मंत्री असेल. दरम्यान, सोरेन यांनी दिल्ली दौऱयादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांची भेट घेतली.

झारखंडमध्ये परतल्यानंतर हेमंत सोरेन यांनी आज शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. शपथविधी सोहळ्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित राहणार आहेत.