शेअर बाजारात गेल्या महिन्यात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर बाजाराची घसरगुंडी सुरुच होती. आता गेल्या आठवड्यात अदानी सुमहाबाबतच्या वृत्ताने बाजारात घट झाली होती. सोमवारी बाजाराने चांगली झेप घेतली होती. त्यानंतर बाजार एकाच रेंजमध्ये फिरत होता. बाजारात नेमकी योग्य दिशा कधीपासून देणार, याची अनेक गुंतवणूकदार वाढ बघत आहे. आता तज्ज्ञांनी याबाबत रिकव्हरीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
शेअर बाजारात बुधवारी पुन्हा काही प्रमाणात रिकव्हरी दिसून आली. बुधवारी सकाळी शेअर बाजाराची सपाट सुरुवात झाली. मात्र, दिवसभरात चढउतारानंतर बाजार वाढीसह बंद झाला. त्यामुळे बाजारात रिकव्हरीला सुरुवात झाली आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. खालच्या स्तरावरून उत्कृष्ट रिकव्हरीसह बाजार हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी 80 अंकांनी वाढून 24,274 वर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 230 अंकांनी वाढून 80,234 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 110 अंकांनी वाढून 52,301 वर बंद झाला.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात चांगली खरेदी झाल्याने बाजार पुन्हा एकदा तेजीत आला आहे. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 16 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. तर उर्वरित 14 कंपन्यांचे शेअर्स नुकसानासह लाल रंगात बंद झाले. त्याचप्रमाणे निफ्टी 50 मधील 25 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. गेल्या आठवड्यात अदानीबाबतच्या वृत्तामुळे अदानी समुहाचे शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. त्यानंतर बुधवारी अदानी समुहाच्या शेअरमध्ये चांगलीच तेजी दिसून आली. अदानी पोर्ट्सचे शेअर्स 5.91 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
गेल्या आठवड्यात बाजारात झालेली घसरण आणि सोमवारची तेजी वगळता बाजार एकाच झोनमध्ये, रेंजमध्ये व्यवहार करत आहे. बाजाराला नेमकी दिशा मिळत नसल्याने अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. तसेच बुधवारी बँक निफ्टीची मंथली एक्सापरी होती. तर उद्या निफ्टीची आणि शुक्रवारी सेन्सेकची एक्सापरी आहे. या व्यवहारात बाजारात तेजी आल्यास बाजार रिकव्हरी करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळतील, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.