जगातील सर्वात वयोवृद्ध जॉन अल्फ्रेड टिनिसवूड यांचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन झाले. 2024 मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून मान्यता दिली होती. ते जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होते. जॉन अल्फ्रेड साऊथपोर्ट केअर होममध्ये राहत होते. 1912 रोजी त्यांचा जन्म झाला होता.
एप्रिल 2024 मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून मान्यता दिली. एप्रिल 2024 मध्ये, वयाच्या 111 व्या वर्षी, व्हेनेझुएलाच्या 114 वर्षीय जुआन व्हिसेंट पेरेझ यांच्या मृत्यूनंतर ते जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती बनले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रॉयल आर्मी पेजेस कॉर्प्समध्ये ते लष्करी सेवेत होते. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी रॉयल मेलमध्ये काम केले आणि नंतर 1972 मध्ये निवृत्त होण्यापूर्वी शेल आणि बीपीसाठी लेखापाल म्हणून काम केले. ब्लंडेलसेंडच्या युनायटेड रिफॉर्म चर्चमध्ये ते एल्डर म्हणूनही काम करत होते, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
लिव्हरपूलमध्ये एका कार्यक्रमात त्यांची ब्लॉडवेनशी भेट झाली. तिच्याशी त्यांनी 1942 मध्ये लग्न केले. 1986 मध्ये त्यांची पत्नी टिनिसवूड यांचे निधन झाले. या जोडप्याने 44 वर्षे एकत्र घालवली. दिर्घायुष्यासाठी नेहमी सक्रीय राहणे आणि कोणत्याही प्रसंगात संयम राखणे हे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले होते. जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती घोषित झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.