हिवाळ्यात पुरुषांना गोवर, गालगुंड आणि रुबेला साथीचा धोका; तर महिलांना आई होण्यात अडचणी?

ऋतू बदलले की आहार आणि आपली जीवनशैलीदेखील बदलते. प्रत्येक ऋतूप्रमाणे आपल्या आहारात बदल करावा लागतो. या बदलत्या हवामानामुळे अनेक आजार देखील आपलं डोक वर काढतात. सध्या थंडीचा महिना सुरू झाला असून या दिवसांमध्ये अनेक जण आजारी पडतात. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञ सावधानतेचा इशारा देतात. मिळालेल्या माहितीनुसार एका साथीच्या रोगाने ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातलाय. त्यामुळे आरोग्य संस्थांनी अलर्ट जारी केला आहे.

थंडीच्या दिवसात साथीचे रोग झपाट्याने वाढतात. आता ब्रिटेनमध्ये गालगुंड येण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच गोवरचे रुग्णही वाढले आहेत. गेल्या वर्षी, युकेमध्ये या आजाराची 36 प्रकरणे नोंदवली गेली होती. तर 2020 मध्ये या साथीच्या 3738 प्रकरणांची नोंद झाली. डॉक्टरांनी दावा केला आहे की, किशोर आणि तरुणांमध्ये साथीचा रोग पसरण्याची शक्यता आहे. तसेच या आजारामुळे महिलांना आई होता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी MMR लस घेण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होते. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या डॉक्टरांनी असा दावा केला आहे. त्यामुळे गोवर, गालगुंड आणि रुबेला यांसारख्या आजारांवर केवळ MMR लस प्रभावी आहे. तज्ज्ञ्यांच्या मते गालगुंडांचा प्रामुख्याने मुलांपेक्षा तरुणांवर जास्त परिणाम होतो. गालगुंड पुरुषांच्या अंडकोषांवर थेट परिणाम करतात. यामुळे दर 10 पैकी एका पुरुषाच्या शुक्राणूंची सख्या कमी होते. या आजारातून वाचण्यासाठी लस घेणे महत्वाचे आह. आत्तापर्यंत एकूण 83.9 टक्के मुलांची ही लस घेतली आहे, अशी माहिती तज्ज्ञ्यांनी सांगितली आहे.