लोअर परळ येथील तानसाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गुरुवार, 28 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजल्यापासून शुक्रवार, 29 नोव्हेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत असे सुमारे 22 तास केले जाणार आहे. त्यामुळे जी-दक्षिण आणि जी-उत्तर या विभागातील लोअर परळ, वरळी, प्रभादेवी, दादर, माटुंगा, माहीम, धारावीमधील काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद तर काही ठिकाणी अंशतः बंद राहणार आहे. दरम्यान, एक दिवस आधी रहिवाशांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा तसेच पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
इथे पाणीपुरवठा बंद
n जी दक्षिण विभाग ः करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग, संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्शनगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, प्रभादेवी आणि संपूर्ण लोअर परळ स्थानक परिसर.
n जी उत्तर विभाग ः सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, एल. जे. मार्ग, अरुणकुमार वैद्य मार्ग.
जल अभियंता विभाग करणार दुरुस्ती
मुंबईतील पाणीपुरवठा व्यवस्था ब्रिटिशकालीन आहे. मात्र मुंबई महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करत वेळोवेळी यात सुधारणा केली आहे. महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडून वेळोवेळी देखभाल, दुरुस्ती तसेच गळतीला प्रतिबंधक करणारी कामे केली जातात. जमिनीखाली अनेक मीटरवर असलेली गळती समजण्यासाठी अत्याधुनिक उपकरणाचा वापर केला जातो. लोअर परळ परिसरातील 1 हजार 450 मिलीमीटर व्यासाची तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम जल अभियंता विभागाने हाती घेतले असून अपेक्षित वेळेपूर्वी हे काम करण्याचे उद्दिष्ट आहे.