देशाच्या नवीन पिढीला एकत्र आणि बळकट करण्याच्या आणि त्यांच्यामध्ये सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुंबईतील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) येथे आजपासून सुरू झालेल्या ‘युवा संगम’मध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहिमेअंतर्गत या सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाच्या पाचव्या टप्प्यात फेअरवेल समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज तिवारी यांनी विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांना संबोधित केले. विद्यार्थी हे आपले भविष्य असून ते मजबूत आणि एकजूट होण्यासाठी त्यांना आपला देश आणि त्याची संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
हा युवा संवाद 6 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. परंपरा आणि अस्सल पाककृतींपर्यंत महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशात स्वतःला विसर्जित करण्याची एक अनोखी संधी या युवा संवादमार्फत अन्य राज्यातील विद्यार्थ्यांना मिळते. आठवडाभराच्या प्रवासात सांस्कृतिक कार्यशाळा, शिकण्याची सत्रे आणि मुंबईच्या ऐतिहासिक आणि आधुनिक ठिकाणांच्या भेटींचा समावेश आहे.