पहिल्या डावातील आघाडीमुळे मॉडर्न, अंजुमन, परागचे विजय

मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या प्रतिष्ठेच्या हॅरिस शील्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मॉडर्न इंग्लिश शाळा, अंजुमन इस्लाम उर्दू शाळा आणि पराग इंग्लिश शाळेने विजय नोंदवले तर अल बरकत इंग्लिश शाळेने अंजुमन इस्लाम उर्दू शाळेचा 8 विकेट राखून पराभव केला. सुपर लीगमध्ये प्रत्येक संघ प्रत्येकी तीन-तीन सामने खेळणार आहे. उर्वरित दोन सामने 28-29 नोव्हेंबर आणि 3-4 डिसेंबरला खेळले जातील.

सुपर लीगच्या पहिल्या फेरीच्या चारपैकी एकाच सामन्यावर विजयाचा शिक्का बसला. रोनील झांझनीच्या फिरकीने अंजुमन इस्लाम (उर्दू) शाळेचा दुसरा डाव 205 धावांत संपवला. त्यामुळे अल बरकत इंग्लिश शाळेचे विजयासाठी 55 धावांचे लक्ष्य होते आणि अल बरकतने ते 2 विकेट गमावत सहज गाठले. रोनीलच ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक

जनरल एज्युकेशन ऍकॅडमी   पहिला डाव – सर्वबाद 123; दुसरा डाव – 8 बाद 167 (आयुष शिंदे 36, अमोघ पाटील 57, शाश्वत नाईक 3/35) मॉडर्न इंग्लिश स्कूल ः पहिला डाव – 9 बाद 229 (घोषित) (देवेश बिर्जे 38, ऋषभ सडाके 37; ओम कोळी 4/81 );

अंजुमन इस्लाम (उर्दू) पहिला डाव – सर्वबाद 109; दुसरा डाव – सर्वबाद 205 (दानियल सिद्दीकी 51, विनायक चौरसिया 49, नितीश निशाद 4/54, वली सय्यद 3/14) ; अल बरकत इंग्लिश ः पहिला डाव- 9 बाद 260 (घोषित) ( वरद मगर 61, देवेन यादव नाबाद 72); दुसरा डाव – 2 बाद 56 ;

 अंजुमन इस्लाम (इंग्लिश) पहिला डाव- सर्वबाद 218 दुसरा डाव – 5 बाद 142 (अब्दुररहमान खान 56, झैद खान 3/41) वि. ज्ञानदीप सेवा मंडळ ः पहिला डाव- सर्वबाद 154 (श्रेयस फोपळे 42, लॅविश सिंह 42; युवान शर्मा 4/44, अब्दुररहमान 4/51); माटुंगा प्रीमियर पहिला डाव सर्वबाद 101, दुसरा डाव 8 बाद 222 (कुशाल पाटील 57, युवा शाह 51; नीरज धुमाळ 4/22) वि. पराग इंग्लिश स्कूल पहिला डाव – 6 बाद 295 (घोषित) (समृद्ध भट 86, श्रीहान हरीदास 61, आयुष मोहंती 50).