मिश्रा, सितवालाला मुंबई स्पोर्ट्सचा पुरस्कार

मुंबईतील क्रीडा क्षेत्राच्या भल्यासाठी झटणाऱया क्रीडापटूंचे ‘मुंबई स्पोर्ट्स’ हे एक मुक्त व्यासपीठ असलेल्या ‘मुंबई स्पोर्ट्स’ या संस्थेच्या द्वितीय सर्वोत्तम वार्षिक क्रीडापटू पुरस्कारासाठी स्नूकरपटू ध्रुव सितवाला आणि ऍथलीट ऐश्वर्या मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. तसेच ऋजुता खाडे (जलतरण), सोनाली बोराडे (ऍक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक्स), अक्षन शेट्टी (बॅडमिंटन) व कुणाल कोठेकर (ऍक्रोबॅटीक  जिम्नॅस्टिक) तसेच विशेष श्रेणीत नताशा जोशी (नेमबाजी) हेसुद्धा पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.

 हा पुरस्कार सोहळा येत्या 28 नोव्हेंबरला कुर्ला येथील बंट्स भवनात सायंकाळी पार पडणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते प्रदान पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात येईल. याप्रसंगी ‘स्पोर्ट्स’ कोड तारक की मारक’ या विषयावर विशेष परिसंवादाचेही आयोजन  करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळय़ासाठी ‘मुंबई स्पोर्ट्स’’ संस्थेचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला, जय कवळी, जया शेट्टी, प्रदीप गंधे, उदय देशपांडे, सुदर्शन नायर, संजय शेटे, भास्कर सावंत, अरविंद प्रभू, नामदेव शिरगावकर यांनी पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली.