आपल्या भावी जोडीदाराबाबत विवाहोच्छुक तरुणतरुणींच्या बऱ्याच अपेक्षा असतात. अशाच एका तरुणीने लग्नासाठी ठेवलेली अट चर्चेत आलीय. सोशल मीडियाच्या एक्स प्लॅटफॉर्मवर जाहिरातीचा एक फोटो व्हायरल होतोय. त्यामध्ये तरुणीने वरासाठी अजब अटी ठेवल्या आहेत.
जाहिरातीत मुलीचे वर्णन सुशिक्षित आणि स्त्रीवादी असे करण्यात आलेय. तिचे केस लहान आहेत आणि ती भांडवलशाहीविरोधात काम करते, असे सांगण्यात आलंय. ही तरुणी 30 वर्षांची असून ती 25 वर्षांचा वर शोधतेय, ज्याचा चांगला व्यवसाय आहे, ज्याच्याकडे 20 एकरात पसरलेले फार्महाऊस असायला हवे. या अटी जाहिरातीच्या माध्यमातून तरुणीने ठेवल्या आहेत. ऋषी नावाच्या एक्स युजरने या जाहिरातीचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला लाखो ह्यजू आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. विवाहोच्छुक तरुणीच्या अजब अटींवर नेटीजन्स कमेट्स करत आहेत.