चिनी कंपनी कामगारांना डेटिंगसाठी देतेय पैसे

एका  चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनोखा उपक्रम सुरू केलाय. या कंपनीने कर्मचाऱ्यांना डेटवर जाण्यासाठी रोख रक्कम द्यायला सुरुवात केली आहे. ‘इन्स्टा 360’ असे या कंपनीचे नाव आहे.

 कामाच्या ठिकाणी आनंद वाढावा आणि सामाजिक नातेसंबंध अधिक बळकट करावे, या दिशेने पुढाकार घेत ‘इन्स्टा 360’ कंपनी हा उपक्रम राबवत आहे. हा निर्णय केवळ कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी समाधान वाढवण्यापुरता मर्यादित नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यालाही सकारात्मक वळण देण्यासाठी आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.   टेक कंपनी कर्मचाऱ्यांना अंतर्गत डेटिंग प्लॅटफॉर्मवर कंपनीबाहेरील व्यक्तीची ओळख करून देणाऱ्या प्रत्येक वैध पोस्टसाठी कर्मचाऱ्यांना 66 युआन (सुमारे 770 रुपये) देईल. ज्या कामगाराचे मॅच मेंिकग योग्य असेल आणि तीन महिने ते संबंध टिकवून ठेवतील, त्यांना मोठे बक्षीस दिले जाईल. या उपक्रमात दोन्ही लोकांना 1,000 युआन (अंदाजे 11,650 रुपये) दिले जातील.  या उपक्रमानंतर कामगारांमध्ये याबद्दल उत्साह होता, कारण कंपनीच्या मंचावर सुमारे 500 पोस्ट अपलोड केल्या गेल्या. सिंगल्सचे प्रोफाइल शेअर करण्यासाठी 10,000 युआनचे रोख बक्षीस देण्यात येते.