एका घराची किंमत 105 कोटी

स्वप्ननगरी  मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. याचीच प्रचीती देणारा घर खरेदी व्यवहार समोर आलाय. मुंबईच्या उच्चभ्रू भागात 105 कोटी रुपयांना घर खरेदी करण्यात आलेय. दीप फायनान्शिअल कन्सल्टंटच्या ऊर्जिता जगदीश मास्टर यांनी वरळी येथील ओबेरॉय रिऍलिटी टॉवरमध्ये 7139 चौरस फुटांचे घर खरेदी केलेय. एका घरासाठी तब्बल 105 कोटी रुपये मोजले आहेत. एका चौरस फुटासाठी तब्बल 1 लाख 48 हजार रुपये मोजले आहेत. टॉवरमध्ये 59 व्या मजल्यावर हा फ्लॅट असून 13 नोव्हेंबर रोजी फ्लॅटच्या खरेदी-विक्री व्यवहाराची नोंद झाली आहे.