EVM प्रश्नावर जनआंदोलनाशिवाय दुसरा मार्ग नाही, नाना पटोले यांचा इशारा

nana-patole

महाराष्ट्रात जे काही निवडणुकीचे निकाल आले आहेत. हाय कमांडलाही याबाबत माहित आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल कोणालाच पटण्यासारखा नाही. ना आम्हाला ना महाराष्ट्रातल्या जनतेला, असे काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले. शिवाय जनभावना सांगते आम्ही दिलेल्या मतांनी सरकार आलेले नाही. EVM प्रश्नाबाबत कोणीच लक्ष देत नसल्यास जनआंदोलनाशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. एएनआयशी बोलताना व्यक्त केले.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, निवडणुकीच्या निकालाबाबत आम्ही मंथन केले आणि त्यावर तोडगा काढण्यात आला. आज सोशल मीडिया पाहिला तर लोक बोलतात हा आम्ही दिलेला निकाल नाही. जनतेच्या भावनेचा काँग्रेस पक्षाने कायम आदर केला आहे. आज मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशीही याच विषयावर बोलण्यासाठी आलो आहे. त्यातून चांगला मार्ग निघेल असेही ते म्हणाले.

न्यायालय निवडणुकीत घोळ झाल्याचे मान्य करण्यास तयार नाही. जनभावनेचे कोणी ऐकायला तयार नाही. त्यामुळे काहीतरी हालचाल केल्याशिवाय रस्ता निघणार नाही. आम्ही न्यायालयात गेलो, सर्वोच्च न्यायालयात गेलो. सर्वोच्च न्यायालयात सांगितले घोळ झाल्याचे सिद्ध करा. जनभावना सांगतं आहे आम्ही एसला मत दिल्यावर वायला जात आहे. ही गोष्ट कोणी ऐकतच नाहीये. त्यामुळे जनआंदोलनाशिवाय आता दुसरा मार्ग नाही. यासाठी आम्ही दुसरा पर्याय विचार करत आहोत. त्यावर मार्ग शोधत आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.