पॅन कार्डवर येणार आता QR Code, मोफत होणार अपग्रेड

pan-card

केंद्र सरकारल लवकरच पॅन कार्ड अपडेट करणार आहे. आता पॅन कार्डवर क्यु आर कोडही असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व सामान्यांना पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाहीयेत. केंद्र सरकारने PAN2.0 प्रकल्प सुरू करण्यास मंजूरी दिली आहे.

सर्व सरकारी संस्थांमध्ये डजिटल कामकाजात पॅन कार्डाचा अधिकृतरित्या वापर व्हावा यासाठी सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी सरकार 1 हजार 435 कोटी रुपये खर्च करणार आहे.

या प्रकल्पामुळे करदात्यांना अनेक फायदे मिळतील. अनेक सरकारी सेवांचा त्यांना थेट फायदा घेता येणार आहेत. तसेच सरकारलाही सामान्य करदात्यांना सेवा देताना सुलभ होणार आहे. एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणार असून करदात्यांची माहितीही सुरक्षित राहणार आहे. यामुळे इको-फ्रेंडली कारभार होणार असून सरकारी पैसेही वाचतील. इतकंच नाही तर करदात्यांना आपले पॅन अपडेट करण्यासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही.