कार्तिकीसाठी आळंदीत भाविकांची मांदियाळी

श्रीचा 729वा संजीवन समाधी दिन सोहळ आणि कार्तिकी एकादशी साजरी होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. प्रारंभी श्री गुरू हैबतराव बाबा यांच्या दिंडीची मंदिर आणि नगर प्रदक्षिणा परंपरेने जयघोषात झाली. भाविकांच्या अखंड हरिनामाने अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

उद्या मंगळवारी (दि. 26) सोहळ्यात पहाटे पवमान अभिषेख, दुधारती, 11 ब्रम्हव्रुन्दाचे वेदमंत्र जयघोष, श्रीना महानैवेद्य, श्रीच्या पालखीची नगर प्रदक्षिणा, धुपारता, संतोष महाराज मोझे यांच्या वतीने हरिजागर सेवा रुजू होणार आहे.

यात्रेनिमित्त आळंदी मंदिर, इंद्रायणी नदीघाट परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आळंदीत नदी किनाऱ्यासह शहरात सार्वजनिक आणि खाजगी संस्थानच्या मोकळ्या असलेल्या जागांवर राहुटय़ांमधून भजन, कीर्तनासह हरिनामाचा गजर सुरू आहे. आज प्रदक्षिणा रस्ता आणि गोपाळपुरा, जुना आणि नवीन पूल परिसरात रस्ते गर्दीने फुलले होते.