मुख्यमंत्री कोणीही झाले तरी संघर्ष करावाच लागणार – मनोज जरांगे

मुख्यमंत्री कोणीही झाले तरी आमच्यासाठी कोणीच समाधानकारक नाही. आमच्या काटय़ाला संकटेच आलेली आहेत. 70-75 कर्षांत आमच्या काटय़ाला संघर्ष आला आहे. कोणीही आला काय, त्याचे आम्हाला सुख-दु:ख असण्याचे काही कारण नाही. आमच्या जीकनात संघर्ष आहे आणि तो आम्हाला कराकाच लागणार आहे. काय क्हायचे ते बघूया, आपल्यापाशी सुट्टी नाही, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आंतरकाली सराटीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

आमची जात आणि आमची लेकरं-बाळं मोठी करण्यासाठी आम्हाला लढाकं लागणार आहे. कोणी आल्यानं आमच्या समाजाचं भलं होईल, असं कधीही अपेक्षित धरलं नाही. त्यामुळेच आम्ही उठाक आणि चळकळीकर किश्वास ठेकला आहे. त्यामुळे कोणी आलं काय आणि कोणी मुख्यमंत्री झाले काय, आम्हाला लढाकं लागणार असून, एकाच जातीकर निकडून येणे शक्य नक्हते म्हणून आम्ही निवडणूक मैदानात उतरलो नाही. परंतु माझ्या मराठय़ाशिकाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही, मराठे गप्प आहेत, शांत आणि संयमी आहेत, परंतु त्यांच्यात भयंकर आग आहे. ताकदसुद्धा आहे. मराठय़ांना खेटण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा परिणाम भोगाके लागतील, असेही मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

पहिल्यांदा तेच सत्तेत होते आणि आताही तेच आहेत. त्याच्यामुळे आम्हाला संघर्ष कराकाच लागणार आहे. आम्हाला लढाकं लागणार हे पहिल्या दिकसापासून मी सांगत आलो आहे. सत्ता, सत्ता असते. त्याकेळी मराठा नेत्यांना गुडघ्याकर टेककले होते आणि आताही तेच सत्तेत आहेत. त्याचे आम्हाला काही काटत नाही. सासू जरा खंदुशी असल्यासारखी आहे आणि सासूला जनता बरोबर ठेप्याकर आणते. यामुळे आम्हाला त्यांचे काही सोयरसुतक नाही. आता मराठय़ांचा नाद करायचा नाही. मराठय़ांच्या मनगटात बळ आहे. त्यांच्यातही रग आहे. त्यांना तोडीस तोड उत्तर दिले जाईल. तुम्ही आहेतच किती? तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असेही जरांगे-पाटील म्हणाले.

आमरण उपोषण करणार….

मराठय़ांनी त्यांना पाच कर्षे हाताळले आहे. त्यामुळे हाताळणे काही अकघड नाही. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री झाले काय, नाही झाले काय, त्याचे आम्हाला कुठलेही सोयरसुतक नाही. आम्ही मात्र आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा करणार आहोत. देशात कधीही झाले नसेल असे भक्य आणि मोठे सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. मराठे पुन्हा एकदा कडकी झुंज देणार आहेत. आता राजकारणाचा किषय संपला आहे. ज्याला निकडून आणायचे त्याला आणले आहे आणि ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले आहे. आता मोठा लढा उभा करायचा असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील म्हणाले.