अदानी, अमित शहा, अजित डोवाल यांना कॅनडा, अमेरिकेत निर्बंध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन खास मित्र उद्योजक गौतम अदानी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कॅनडा, अमेरिकेत जाण्यावर निर्बंध आले आहेत. तिघांना या देशांमध्ये जाता येणार नाही. अदानी यांच्यावरील आर्थिक अनियमिततांबाबत तपास सुरु आहे. तर अमित शहा यांनी त्यांच्या कार्यकाळात मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरही हेरगिरी किंवा पाळत ठेवण्याच्या संशयावरून अमेरिका, कॅनडामध्ये जाण्यावर निर्बंध आले आहेत. दरम्यान, मोदींच्या तीन हुकमी एक्क्यांवर कॅनडा, अमेरिकासारख्या देशांमध्ये जाण्यावर निर्बंध आले आहेत, अशा शब्दांत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.