देशभरातून महत्वाच्या बातम्या

दिल्लीत दिवसा दिसेनासे झालेय…

दिल्लीतील प्रदूषणाचा स्तर खूपच वाढला आहे. प्रदूषण वाढल्याने अनेक ठिकाणी अंधूक आणि अस्पष्ट दिसत आहे. दिल्लीतील ‘कर्तव्य पथ’ येथील हे दृश्य सर्वकाही सांगून जात आहे.

ऍपलचा ब्लॅक फ्राय डे सेल
ऍपलचे प्रोडक्ट्स आयफोन, आयपॅड, मॅक, ऍपल वॉच आणि एअरपॉड्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. ऍपलचा ब्लॅक फ्राय डे सेल 29 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये ऍपलचे प्रोडक्ट खरेदी करणाऱयाला गिफ्ट कार्ड मिळणार आहे. हा सेल 2 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

तैवानसाठी अमेरिका सरसावली
तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिका आणि जपानने महत्त्वाचा निर्णय घेतला. अमेरिकेचे लष्कर जपानच्या नान्सेई बेट आणि फिलीपाईन्समध्ये तात्पुरता लष्करी तळ उभारणार आहेत. या लष्करी तळावर मिसाईल तैनात केले जातील. तैवानच्या सुरक्षेचा विचार करून अमेरिका आणि जपानने पहिल्यांदा हे संयुक्त ऑपरेशन केले आहे.

अमेरिकेत ‘एक्स’ला ‘ब्लूस्काय’ची टक्कर

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर ‘ब्लूस्काय’ हा शब्द सतत दिसतोय. इंटरनेट युजर्समध्येही त्याबद्दल चर्चा सुरू आहे. एलन मस्कच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी हा चांगला पर्याय असल्याचे मानले जातेय. अमेरिकेत तब्बल दीड लाख लोकांनी ‘एक्स’ प्लॅटफॉर्म सोडले असून ते ‘ब्लूस्काय’वर आले आहेत. ट्विटरचे आधीचे मालक जॅक डोर्सी यांनी ‘ब्लूस्काय’ बनवला आहे. ‘ब्लूस्काय’चा लोगो आणि त्याचे रंगही ‘एक्स’सारखेच आहेत.