NSUI ने दिल्ली विद्यापीठात इतिहास घडवला; आठ वर्षांनंतर मिळवले अध्यक्षपद

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ने बाजी मारली आहे. या निवडणुकीत NSUI इतिहास घडवत आठ वर्षानंतर अध्यक्षपद मिळवले आहे. भाजपचे अनेक मुख्यमंत्री आणि हिमंता आणि तेजस्वी सूर्या सारख्या प्रमुख नेत्यांनी ABVP साठी प्रचार केला होता. मात्र, वरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखालील एनएसयूआयने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी निवडणुकीत एबीव्हीपीला पराभूत केले आहे. सत्याचा नेहमी विजय होतो. दांभिकता आणि अंहकार यांचा नाश होतो. तेच या निवडणुकीत घडले असल्याचे NSUI ने सांगितले.

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत रौनक खत्री यांची नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या अध्यक्षपदी निवड झाली. या विजयाबाबत रौनक खत्री म्हणाले, आज इतिहास घडला आहे. आपण इतिहास बदलला आहे. हे सर्व आपल्या कामामुळे शक्य झाले आहे. ढोंग आणि अहंकाराचा पराभव झाला आहे. विधी शाखेचा विद्यार्थी या नात्याने मी सर्व विद्यार्थ्यांना खात्री देतो की मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन. त्यांनी मला विजयी केले आहे, पायाभूत सुविधा आणि कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांशी असलेले वर्तन याला सर्वोच्च प्राधान्य असेल, असेही खत्री यांनी सांगितले.

वरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखालील एनएसयूआयने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. याबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आम्ही या निवडणुकीत 4-0 ने आशावादी होतो, परंतु एनएसयूआयने अध्यक्ष आणि सहसचिव पदे जिंकली. याचे निकाल हरियाणा निवडणुकीपूर्वी येणे अपेक्षित होते. मात्र, विद्यापीठाने कट रचला आणि त्यामुळेच डीयूएसयूचा निकाल इतका उशीरा लागला, मी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि डीयूच्या विद्यार्थ्यांचेही आभार मानतो, असे एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरी यांनी सांगितले.